तो.. बराचसा एकलकोंडा. आपल्या विशिष्ट कोशात, वर्तुळात वावरणं पसंत करणारा. त्याला वाचनाची फार आवड. वाचनासाठी विषयांचा परीघ प्रेमकथा ते इतिहास, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, जगत्कारण असा भलामोठा. वाचनाची आवड आणि स्वतःच्या वर्तुळात असण्याची आवड यामुळे मित्र परिवाराचा परीघ मात्र मर्यादित. या मर्यादित मित्र परिवारात असताना देखील त्याची भूमिका मुख्यतः श्रोत्याची असते. त्या मर्यादित वर्तुळात तो आनंदी असतो. माफक हास्यविनोदही करतो. पण त्यापलीकडे जात नाही. आपण बरं, आपलं काम बरं, आपलं वाचन बरं या रेषेवर तो चालतो. सहजतेने.
या रेषेवर आणि वर्तुळाच्या परिघात ती केव्हा आली ते त्याला कळलंच नाही. एके दिवशी, ती आली. त्या मित्र परिवारातील एकीची मैत्रीण म्हणून. इतर गोतावळा काहीसा मोकळा, त्याच्या स्वभावाच्या काहीसा विपरीत. त्यामुळे ती त्या परिवारात समाविष्ट झाली. सहजतेने. एखादी नवी गोष्ट, व्यक्ती त्याच्या परिघात आली तर तिचा स्वीकार पटकन करणं त्याला जड जातं. पण या त्याच्या स्वभावाच्या विपरीत असं काहीतरी झालं की ती, त्याच्या परिघात देखील लगेच समाविष्ट झाली. सहजतेने.
भेटी वाढू लागल्या. त्या समूहातच अधिक असत. पण आता त्याची श्रोत्याची भूमिका काहीशी बदलली होती. त्याचा सहभाग वाढू लागला होता. त्याच्याही नकळत. तो सहभाग वाढण्यामागे तिचा वाटा होता. त्याला कुठेतरी तार जुळल्यासारखी वाटत होती. तिने विचारलेले प्रश्न, तिने केलेल्या वक्तव्यांना दाद देणं या पद्धतीने त्याचा सहभाग वाढत होता. तो सहभाग वाढत गेला. आणि दुसरी एक गोष्ट झाली. त्या दोघांचा आपापसातला संवाद सुरु झाला. तो प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा मोबाईलवर चॅट या प्रकारातच जास्त होऊ लागला. सहजतेने.
ती... केवळ अपघाताने या मित्र समूहात आलेली, आता अविभाज्य भाग झाली होती. सुरुवातीला तिचं तो कडे फारसं लक्ष गेलं नाही. का जावं? सर्व समूहात काहीसा शांतपणे, अलिप्त वाटावा अशा प्रकारे तो बसलेला होता. सुरुवातीला लक्ष गेलं नसलं तरी नंतरच्या भेटीत मात्र तिला काहीसं वेगळेपण जाणवलं. तो जरी शांत असला, फारसा सहभागी नसला तरी त्याचं एकूण संभाषणावर बारीक लक्ष आहे असं तिला जाणवलं. कारण त्याची अगदी क्वचित येणारी वक्तव्यं, प्रश्नांची उत्तरं यातून त्याचं एकूण संभाषणावर बारीक लक्ष असल्याचं आणि सूक्ष्म नोंद घेत असल्याचं तिला जाणवलं.
भेटी वाढल्या. समूहातच त्या अधिक असल्या तरी तिला आता एक फरक दिसू लागला होता. त्याचा सहभाग वाढला होता. ती विचारात पडली. हा काहीतरी वेगळाच आहे. तो बोलत असताना अनेक संदर्भ त्याच्या जिभेवर असतात. वक्तव्य, युक्तिवाद आणि मतं ठाम असतात. कोणी विरोधी मत व्यक्त केलं, विरोधी युक्तिवाद केला तर तो शांतपणे ऐकून घेण्याची त्याची तयारी असते. काहीतरी वेगळं आहे. हा समूहात मोजकं बोलतो पण जे बोलतो त्याची दाखल इतर सर्व जण घेतात. असं तिला जाणवलं.
हा खासगीत बोलत असेल का? तिने सुरुवातीला फोन केला. सहजच. ती बोलत होती. तो फक्त ऐकत होता. समूहात असताना तो जितकं बोलत होता त्यापेक्षा खूपच कमी असा खासगीत बोलत होता. ती विषय वाढवत संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करत होती. पण अर्धा ते एक वाक्याच्या पुढे जात नव्हता. एका क्षणी तिला जाणवलं की हे काही खरं नाही. मग दुसरा विकल्प होता. तो म्हणजे मोबाईल चॅट. तिथे तो अधिक खुलेपणाने बोलत होता. तो प्रत्यक्ष संभाषणात फारसा उत्सुक नसला तरी तो छान लिहितो असं तिला जाणवलं.

Comments
Post a Comment