मी का नाकारू? 


ती अनपेक्षित भेट, सुखावून जाण्यासारखी
ती मनातल्या कोपऱ्यात दडवून ठेवलेल्या छबिसारखीच
ती भेटली, मनाचा कोपरा उघडला गेला
मी का नाकारू...
अनेक वर्षानंतर झालेली ती भेट
अनेक आठवणी जागवून गेली
सुखद आठवणींचा पेटारा उघडला गेला
मी का नाकारू...
एवढ्या अंतराने झालेली ती एक भेट
मनाला सुखावून गेली, प्रश्न पाडून गेली
पुन्हा भेट अशीच अनेक वर्षांनंतर की... 
सुखवणाऱ्या क्षणानंतर पडलेला हा प्रश्न,
गोंधळात, विचारात पाडतो, अस्वस्थ करतो
मी का नाकारू...??

मुक्तछंदातली कविता. कवितेच्या रूढ निकषांवर तपासून पाहता ही कविता ठरेल का हे देखील ठाऊक नाही. पण डोक्यात येत गेलं, लिहिता झालो..... 

Comments