कोण नक्की कोणाच्या मनाशी खेळत आहे? कोण कोणाची समजूत काढत आहे?.. संभ्रम! सगळ्याच बाबतीत. भविष्य काय आहे? अनभिज्ञ! वर्तमान काय आहे? चाचपड! भूतकाळ काय होता? विचित्र! 

भूतकाळातील एक व्यक्ती अचानक एके दिवशी समोर येऊन ठाकली. त्या क्षणी मनात काही झालं नसेल पण नंतर भन्नाट वादळ निर्माण झालं आहे. दीपस्तंभासारख्या माझ्या निश्चयाला, व्यवहारी निर्णयांना धडका देत आहे. वादळ निर्माण करणारी व्यक्ती मात्र नामानिराळी झाल्या सारखी झाली आहे. म्हणून प्रश्न पडतो आहे, कोण कोणाच्या मनाशी खेळत आहे? 


Comments