तो निघाला. आपल्याच तंद्रीत. आपल्याच विचारात. आजुबाजुला काय आहे, कसं आहे, का आहे ह्याकडे 'तो' एकाचवेळी संवेदनशीलतेने आणि त्याचवेळी तितक्याच तटस्थपणे बघत होता. ही अशी एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याची, शिवाय स्वतःच्या तंद्रीत-विचारात गुरफटून राहण्याची विलक्षण हातोटी 'तो'ला साधली होती. तो रस्त्याने चालला होता.
'तो' रस्त्याने चालला होता. रस्त्यातले असंख्य जीवघेणे खड्डे बघत होता. रस्त्यातली रहदारी बघत होता. रस्त्यात काहीसे निर्विकार पण मनात असंख्य विचार वावरणारी माणसं बघत होता. माणसं अधिक लक्षपूर्वक बघत होता. ह्या काहीशा व्यवहारी आणि भीषण वास्तववादी वातावरणात मधुनच एखादी प्रेक्षणीय 'वस्तू'देखील दिसायची. सौन्दर्यदृष्टीने तो बघत होता.त्यात काही चूक आहे असं त्याला कधीच वाटलं नाही. कारण ते बघणे कधी विकृततेकड़े आणि एका वखवखीकड़े जाणारं नाही याचे 'तो'वर नैसर्गिक संस्कार झालेले आहेत. शिवाय 'तो' खूप विचार करून आणि इतर कारणान्मुळे काहीसा संन्यस्त वृत्तीकड़े झुकायला लागला आहे की काय,अशी शंका घेण्यास वाव आहे. तरीही 'तो'च्या मनात त्या एका 'ती'चा विचार, आठवण कायम आहे. मनाच्या एका कोपऱ्यात 'ती' दडून बसलेली आहे. 'ती' कुठे आहे, कशी आहे,माहिती नाही.माहिती करून घेण्याची 'तो'ला इच्छाही नाही. 'तो' रस्त्याने चालला होता.
'तो' इप्सित स्थळी पोचला. रांग धरून उभा राहिला. सरकत सरकत पुढे गेला. खिडकीशी आल्यावर पैसे दिले. प्रवासासाठीचं तिकिट घेतलं. बसचं दार उघडलं. आपल्या आसनाकडे जात असताना लक्ष गेलं. आपल्या आसनाशेजारी जे होतं ते बघून 'तो'च्या मनात विलक्षण भावना उमटल्या. त्या संमिश्र होत्या. एकाचवेळी आश्चर्य, अचंबा, आनंद आणि बरंच काही वाटलं. का? कारण काहीसं अतिरंजित वाटणारं आणि अगदीच 'फडके कादंबरी' पद्धतीचं वाटू शकतं. शेजारच्या आसनावर 'ती' बसलेली होती. ह्याला योगायोग म्हणावं की आणखी काही, काही कळत नव्हतं. आनंदाची एक लहर 'तो'च्या मनात उमटून गेली असली तरी त्यानंतर मात्र एक विलक्षण अस्वस्थतेची स्थिति निर्माण झाली. का?
कारण बघताक्षणी 'तो'ने 'ती'ला ओळखलं असलं तरी 'ती'ने ओळखलं असेल का? 'तो'च्या दिसण्यात, वागण्यात एकंदर व्यक्तीमत्वात आमूलाग्र बदल झाला होता. पण 'ती' काही किरकोळ बदल वगळता काही बदलली नव्हती. म्हणूनच प्रश्न पडले होते. आणि प्रचंड अस्वस्थता..

Comments
Post a Comment