जिंदगी ! दोस्तोन कि दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी… 
       काय आहे साली हि दोस्तोन की दुनियादारी? मुळात दोस्त-मित्र कुणाला म्हणायचा? कसे असतात हे मित्र? कसे होतात हे मित्र? नुसत्या दोन-चार वेळा भेटी झाल्या, दोन-चार वाक्य बोलली ती सुद्धा नुसतीच फोरमल चौकशी करणारी, की झाली मैत्री? खरंतर मैत्री व्हायला नुसती एक भेट आणि एक संभाषण देखील पुरतं. समोरच्या माणसाशी पहिल्याच भेटीत सूर जुळले कि गाठी पक्क्या होतात. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत असं होतंच असं नाही. काही लोक आयुष्यभर एकमेकांना ओळखून असतात पण त्यांच्यात मैत्री अशी होतच नाही. मित्र म्हणजे कसा असावा? तो असावा असा म्हणणारा,
                
                                    "ये दोस्ती हम नही तोडेंगे,
                                     तोडेंगे दम मगर 
                                     तेरा साथ ना छोडेंगे… "
कुठल्याही धाडसी निर्णयाच्या आधी कुठलाही माणूस मागे वळून पाहतोच. तेव्हा, त्याच्या पाठी 'तू पुढे हो, आत्मविश्वासानं पुढे जा आम्ही आहोत तुझ्यासोबत.. ' असं म्हणणारे एक आई-वडील असतात आणि दुसरे ते सच्चे मित्र असतात. 
                 आपल्या आई-वडिलांपासून दूर अनोळखी शहरात होस्टेलवर राहिलेल्या-राहणाऱ्या आमच्यासारख्यांना तर 'मित्र' हेच कुटुंब असतं. होस्टेल वर प्रत्येक प्रकारचा एक नमुना असतोच. कुणी लवकर मिसळत नाही-मिसळू शकत नाही. कुणाला मिसळायला आवडत नाही. कुणी खूपच बोलघेवडा असतो. असे एक न दोन… मी ज्या होस्टेल वर राहायचो ते पुण्यातलं शिस्तीच्या बाबतीतलं सुप्रसिद्ध होस्टेल होतं. रात्री दहा नंतर बाहेर जाता येत नाही- बाहेरून आत येता येत नाही. रात्री १० नंतर आपल्याच रूम मध्ये देखील कोणाशी बोलायचं नाही, अगदी फोन वर देखील नाही. (आम्ही हे सगळे नियम धाब्यावर बसवले होते. ही गोष्ट निराळी) आता होस्टेल म्हटल्यावर जागरणं आली, अगदी महाभारत ते काग्तिक राजकारण यांवरचे रात्री २-२ वाजेपार्यान्ताचे गप्पांचे फड आले. मित्रांचे वाढदिवस साजरे करणं आलं. या वाढदिवसावरून आठवलं, माझं होस्टेल वरचं पहिलं वर्ष होतं, माझ्याच वाढदिवशी, रात्री १२ वाजता 'वाढदिवस' (होस्टेल वरचा ) साजरा करणं सुरु होतं,
                " अबे लगा उसके मुँह पर केक.… "
                "हे बघ, हि शाई टाक… "
                "ए, शाई नको बे, चू.. "
                "उचला त्याला… " उचलून लाथांचा वर्षाव सुरु होता. आरड्या-ओरड्या मुळे खालीच राहणाऱ्या रेक्टरना चाहूल लागली. अचानक जिन्यातले लाईट लागले. पोरांना समजलं कि रेक्टरना कळलं आहे. बास्स!!! अक्षरशः दुसरया मिनिटाला सगळे आपापल्या रूम मध्ये. भयाण शांतता. कोणाला शंका देखील येणार नाही कि दोनच मिनिटा पूर्वी इथे एवढा गोंगाट होता.  त्यानंतर असाच एका मुलाच वाढदिवस होता . असाच धुमाकूळ सुरु होता तो नेमका आमच्या रूम च्या समोर. रूम नं. ३१२. त्या रात्री रेक्टरन आम्ही सगळे  सापडलो. झालं त्यानंतर कुणाचाही वाढदिवस असो, आम्ही त्यात असो वा नसो, आमचं नाव त्या गुन्हेगारांमध्ये असणारच. म्हणूनच की काय, त्या रूम ३१२ मध्ये घट्ट झालेली मैत्री होस्टेल सोडल्यानंतरही तितकीच घट्ट आहे. किंबहुना अधिकच वाढली आहे. 
               आता हे सगळा पाल्हाळ लावण्याचं कारण इतकंच की, माझ्या आयुष्यात मित्र कसे आले. मैत्रीचे बंध असेच फुलात जातात, त्यांची वीण घट्ट होते आणि आयुष्यभर तुटत नाही. काही वेळा असंही होतं की आपण एखाद्याला-एखादीला आपला खूप चांगला मित्र-मैत्रीण समजत असतो. पण वेळ आली की कळून येतं. यांच्याशी कधी आपली मैत्री नव्हतीच. त्यांना मैत्री तोडायला काहीही क्षुल्लक कारण पुरतं. ( फोनच करत नाही किंवा आम्हाला नाही पण इतरांनाच नेहमी फोन करता. हे एक प्रातिनिधिक कारण. हे उदाहरण ज्यांना समजायचं त्यांना बरोबर समजेल, इतरांनी खोलात शिरू नये… ) असले लोक आयुष्यातून लवकर दूर जाणंच चांगलं. कारण आपल्या सुख-दुःखाच्या सगळ्याच प्रकारच्या प्रसंगी सच्चे मित्रच सोबत असतात.  
               
                              "तेरी जीत, मेरी जीत… 
                               तेरी हार, मेरी हार.. 
                              ऐसा अपना प्यार… " 
 असा म्हणणाराच आपला खरा मित्र असतो. म्हणूनच आपण मुक्त कंठानं गाऊ शकतो 
                     "मै जिंदगी का साथ निभाता चल गया,
                            हर फिक्र को धुँवे में उडाता चला गया.… "
  कारण गाठीशी मित्र नावाची अफाट ताकद सदैव सोबत असते.  

Comments